गाय गोठ्यासाठी तुम्ही अर्ज केला का ? सव्वा दोन लाखांपर्यंत मिळतेय अनुदान! असा करा अर्ज
Gay Gotha Anudaan Yojana:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
गाय गोठ्यासह कुक्कुटपालन तसेच शेळीपालनासाठी शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान मिळते.
ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्याची जागा ओबडधोबड व खाचखळग्यांनी भरलेली असते.
हे गोठे क्वचितच व्यवस्थित बांधले जातात. गोठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र पडलेले असते. पावसाळ्यात गोठ्यातील जमिनीस दलदलीचे स्वरूप प्राप्त होते.
या जागेतच जनावरे बसत असल्याने ती आजारांना बळी पडतात. काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी.
त्यामुळे जनावरांना चारा व खाद्य देण्यासाठी गव्हाण बांधणे आवश्यक आहे. सिमेंटचा गोठा बांधल्यास जनावरांचे चांगले संगोपन होऊ शकणार असल्याने त्यास प्राधान्य आहे.
गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान किती ?
२ ते ६ जनावरांचा गोठा : दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधकामासाठी एकूण ७७ हजार १८८ रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते.
७ ते १२ जनावरांचा गोठा : सात ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच १ लाख ५४ हजार ३७६ रुपये दिले जातात.
१३ पेक्षा जास्त जनावरांचा गोठा :
तेरापेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकाराच्या तीन पट म्हणजेच २ लाख ३१ हजार ५६४ रुपयांचे अनुदान दिले जाते.
८७८:गाय गोठ्यांचे बांधकाम सध्या जिल्ह्यात प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले.तसेच नवीन प्रस्तावही स्वीकारले जात आहे.
यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र झेरॉक्स, उत्पन्न दाखला, पासपोर्ट फोटो, बैंक पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर, ग्रामपंचायत शिफारस पत्र, जागेचा ७/१२ दाखला, पशुधन असण्याचा दाखला, नरेगा (रोहयो) जॉब कार्ड, गोठा बांधणी अंदाजपत्रक. शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
काय आहे गायगोठा योजना
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे योग्य पालन करण्यासाठी, आर्थिक मदत पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे.
जनावरांसाठी योग्य निवारा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना रुग्णता येण्याची शक्यता वाढते.
विशेषतः ऊन, पाऊस, वारे आणि वादळापासून संरक्षण मिळण्यासाठी गाय गोठा योजना महत्त्वाची ठरली आहे.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि दूध उत्पादनामध्ये वाढ करणे आहे. या योजनेसाठी जनजागृती मोहीमही सुरू आहे.
योजनेचे फायदे काय?
आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते. दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही.
या योजनेत कोणाला अर्ज करता येणार?
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्वतःची जमीनः लाभार्थ्यांच्याकडे गोठा उभारणीसाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
एक कुटुंब एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते. लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो. जर शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते.
अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील अनुदाना 3 आर्थिक बोजा कमी होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल.
गाय-गोठ्याच्या योजनेसाठी अर्ज कसा करणार ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातून अर्जी घेऊ शकतात. तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयातसुद्धा चौकशी करू शकतात.
गाय गोठ्यासह कुक्कुटपालन, शेळीपालनासाठी शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठीसुद्धा अनुदान दिले जात आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.

Hello,
I Am Founder OF TechTadaka.com